How To Increase A Cibil Score - सिबिल स्कोर कसा वाढवावा.

                  सिबिल स्कोर कसा वाढवावा.


            सिबिल स्कोर संपूर्ण माहिती मराठी मध्ये



ClBIL SCORE  :-

                  हा टॉपीक त्या लोकांसाठी अत्यंत कामात येतो, जे नवीन नवीन मार्केटला येत आहेत. असे पण खूप fraud वाले लोक पण असता कि ते आपल्यांना सांगतात कि तुमचा Cibil Score चांगला नसेल तरी तुम्हाला लोन मिळेल तर तुम्ही अश्या लोकांपासून सावध राहा कारण जेव्हा आपला Cibil Score चांगला असेल तेव्हाच आपल्याला लोन मिळेल.
           Cibil Score कसा वाढवावा याची पण माहीती मी ह्या पोस्ट मध्ये शेवटी दिली आहे. ते पण तुम्ही वाचू शकता.

     


हे Cibil Score प्रकरण नेमक आहे तरी काय?

          सर्व सामान्य लोकांना मुळात दोन प्रकाराच्या सवयी असतात. 
 
1. काही लोक थोडे थोडे पैसे गोळा करून छोटी-मोठी स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतात.(Depositing Habit)

2. अन काही लोक कर्ज घेऊन छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करतात व नंतर ते कर्जाची परत फेड करतात. (Repayment Habit

     


या दोन्ही गोष्टीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे. पूर्वी लोक काय करायचे की वेगवेगळ्या बँकेमधून कर्ज काढायचे, यामुळे यातील एका बँकेचा दुसर्या बँकेला पत्ता नसायचा. त्यावेळेस जे काही कागदपत्रे महत्वाचे असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टिफिकेट

                 यामुळे बँकांमध्ये खूप गोंधळ व्हायचा व प्रोब्लेम पण खूप यायचे त्यासाठी एक नवीन कंपनी उदयास आली ती म्हणजे – Credit Information Bureau Ltd. आज या कंपनी च नाव TransUnion CIBIL LTD अस आहे. हि कंपनी भारतातल्या सर्वच लहान-मोठ्या बँकां, वित्तीय संस्था यांच्याशी जोडली गेली आहे. यावर RBI ची मॉनीटरींग आहे.





               समजा आपण बँकेत गेलो अन आपण कर्जासाठी अर्ज केला, तर तेव्हा आपल्याला बँकेचा प्रतिनिधी म्हणतो कि तुम्ही दोन-तीन दिवसांनी या !

      


आता या दोन ते तीन दिवसात बँक नक्की काय करते ते म्हणजे सर्वात अगोदर ती तुमचा CIBIL रिपोर्ट मागवते आणि त्याची Payment History CIBIL Score चेक करते.  

              जस मुलीसाठी किंवा मुलासाठी लग्नाचं स्थळ शोधल्यानंतर त्यांचा सर्व मागचा पुढचा इतिहास जसा चेक करता तसेच बँक पण लोन काढणार्याचा इतिहास म्हणजेच CIBIL SCORE रिपोर्ट चेक करते. 

CIBIL SCORE कसा मोजला जातो :-

           CIBIL Score हा 300 ते 900 मध्ये मोजला जातो. जर का तुमचा सिबिल स्कोर हा 750 ते 900 च्या दरम्यान असेल तर तुम्हाला लगेच लोन मिळेल. पण जर का तुमचा सिबिल स्कोर हा 650 च्या खाली असेल तर बँक तुम्हाला म्हणेल की तुम्ही तुमचा सिबिल स्कोर चांगला करून आणा !
     
           कर्ज मिळतच नाही. म्हणजे समजल असेल तुम्हाला आता कि बँक कर्ज देण्यास का नाकारते. तर सिबिल स्कोर नीट नसतो.

     CIBIL Score कमी का होतो :-






     
         या अश्या प्रकारच्या गोष्टींमुळे Cibil Score वर वाईट परिणाम होतो. मुळात बँकांचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहीती स्वतःहून CIBIL ला देतात आणि तेथून मग कोणतीही बँक ती माहीती चेक करू शकते. 

  



             याचाच अर्थ असा कि आजच्या या डिजीटल युगात कोणी बँकांना मूर्ख बनवू शकत नाही. (बाकी जे काही बँकेचे घोटाळे आहेत. तेव्हा कोणी एवढी माहीती चेक करत नसत.)

   
     


       खर तर बँकांचा महत्वाचा व्यवसाय हा लोन देणेच आहे. कारण तिथून त्यांची खरी कमाई होते. पण लोन दिलेली रक्कम योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.  


CIBIL Score कसा वाढवावा/सुधारावा :-









         Cibil Score निव्वळच कमी असणे म्हणजे, आजपर्यंत तुम्ही कधीही बँकिंग लोन सिस्टम चा वापरच नाही केला अस दाखवते.

           यामध्ये NA- No Activity / NH- No History असे पर्याय दिसू शकतात. तर मग अश्या वेळेस अस करा कि, एखाद छोट Personal Loan घेऊन वेळेवर परतफेड करावी. अश्या प्रकारे तुमची Cibil History पण तयार होईल व सिबिल स्कोर पण वाढेल.

                    बँकिंग सिस्टम कशी काम करते, याबाबत आपल्या मराठी लोकांमध्ये जागृती नाही किंवा त्यांना अश्या गोष्टींच बरच knowledge नाही, कोणी काहीही सांगून फसवते तर अश्या गोष्टीना आला घालण्यासाठी मी माझ्या ह्या Website वर बँकिंग knowledge असो किंवा इतर कोणतीही माहीती असो मी टाकत असतो. व अश्या महत्वाच्या माहीती तर मी आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहचवत तर आहेच पण तुम्ही पण माझे असे पोस्ट Facebook, Whatsaap, Social Site वर पोस्ट करून आपल्या लोकांना फसवणुकी पासून वाचवू शकतो. चला तर मित्रानो तर हि माहीती शेअर करू या.

        (तुम्हाला पण जर का असे कंटेंट लिहायची आवड असेल तर तुम्ही माझ्या सोबत जुडू शकता त्यासाठी मला तुम्ही Instagram वर SMS करू शकता किंवा Mail करू शकता.)




                                               लेखक :- भुषण सावंदे   


Post a Comment

0 Comments